मुलीची हत्या करुन पत्नीने पाठवली भावाला सुसाइड नोट...  

Image may contain: textठाणे, ता. ४ मार्च २०२० : भात गिरणीत काम करणाऱ्या एका कर्मचार्‍याने आणि त्याच्या पत्नीने आपल्या ४ वर्षांच्या मुलीची हत्या करुन नंतर दोघांनीही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे.रविवारी या जोडप्याने त्यांच्या मुलीची हत्या करुन काही वेळाने स्वत:चंही आयुष्य संपवलं.डोंबिवली ग्रामीणमधील डायघर येथे ही घटना घडली.आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव शिवराम पाटील असे आहे.पत्नी दीपिका आणि शिवराम हे घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.


प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या या कुटुंबाने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली सुसाइड नोट आत्महत्या करण्यापूर्वी दीपिकाने व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या भावाला सुसाईड नोटचा मेसेज पाठविला.या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या १३ नातेवाईकांची नावं लिहून हे सर्व जण सतत त्रास देत असल्याचा आरोप केला होता.आपल्या नातेवाईकांकडून तू जमीन मिळवावी आणि ती नंतर अनाथांना द्यावी असं दीपिकाने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये म्हटलं आहे.


सोमवारी दुपारी २ वाजल्याच्या सुमारास पोलिसांना फोनवरुन या घटनेची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ३ ही मृतदेह ताब्यात घेतले.हे ३ ही मृतदेह त्यांनी पोस्टमार्टमसाठी पाठविले आहेत.पोलिसांना घरामध्ये एक कागदाचा तुकडा सापडला तर खिडकीच्या बाहेरही कागदाचे अनेक तुकडे सापडले आहेत.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,कागदाचे तुकडे हे सुसाईड नोटचाच एक भाग आहे.जे या जोडप्याने आत्महत्येपूर्वी लिहलं होतं.सुसाईड नोटमध्ये १३ जणांची नावे होती.सुसाइड नोट वाचल्यानंतर पोलिसांना १३ जणांची चौकशी सुरु केली आहे.त्यापैकी मनोहर पाटील आणि वैभव पाटील अशी ओळख पटलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या