शिक्षकांच्या तत्परतेने सैनिकाला जीवदान...

Image may contain: 8 people, people standing
शिरुर, ता. ५ मार्च २०२० (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावरील शिरूर बाह्यवळण रस्त्यावर हिंगणी मार्गावर असणाऱ्या उड्डाण पुलावर महाशिवरात्रीच्या दिवशी (दि. २१) रोजी संध्याकाळी ५ वाजल्याच्या सुमारास भारतीय सुरक्षा दलात कर्तव्य बजावणारे देवदैठण ता. श्रीगोंदा येथील संतोष गोरख अलभर यांचा दुचाकी घसरून अपघात झाला.ते सध्या बंगालमधील किशनगड येथे सेवेत आहेत.गावी सुट्टीला येऊन एकच दिवस झालेला असताना झालेल्या अपघातात अलभर यांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागुन प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले.प्रवास करणाऱ्या कमीत कमी शंभर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.काहींनी रुग्णवाहिकेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.तर काहींनी थेट घरच्या व्यक्तींना संपर्क केला.
     यावेळेस देवदैठण येथील विद्याधामचे क्रीडा शिक्षक संदीप घावटे व्यायामासाठी जात होते.रस्त्यावर काहीतरी घडलय याचा अंदाज घेऊन मातीच्या भरावावरून ते उड्डाणपुलावर गेले.बेशुद्ध अवस्थेतील अलभर यांचा चेहरा पुर्ण माती व रक्ताने भरलेला होता.कोण आहे म्हणून चौकशी करताच संदीप घावटे व शिक्षक सतीश कौठाळे यांनी जाणाऱ्या येणाऱ्या गाडयांना आडवे होऊन थांबवण्याचा प्रयत्न केला.पण कोणीच मदतीला धावले नाही.अशा वेळी नगरच्या दिशेने आलेले प्राथमिक शिक्षक राजेंद्र ठुबे यांची गाडी पाहीली व संदीप घावटे यांनी जोरात आवाज दिल्यानंतर राजेंद्र ठुबे यांनी कुटुंबियांना खाली उतरवले व मदतीला आले.

इतरांच्या मदतीने अलभर यांना जखमी अवस्थेत शिक्षक संदीप घावटे, राजेंद्र ठुबे यांनी वेदांता हॉस्पीटलला घेऊन गेले.तेथे गेल्यानंतर डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. हेमंत पालवे व डॉ. धनंजय पोटे यांनी झटपट उपचार सुरु करून नाकात व तोंडात झालेला रक्तस्त्राव व माती अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर साफ केली.नाक व जबडा व इतर ठिकाणी चेहऱ्यावर झालेल्या जखमांना जवळ जवळ ७० टाके टाकले गेले.उपचारांना साथ देत अलभर दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आले. १० दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला.संदीप घावटे, सतीश कौठाळे, राजेंद्र ठुबे या शिक्षकांच्या मदतीमुळे देशसेवा करणाऱ्या एका सैनिकाचे प्राण वाचले .
    


शिरूर तालुका डॉट कॉमशी बोलताना शिरूर येथील वेदांता हॉस्पीटलचे  डॉ. आकाश सोमवंशी म्हणाले की सैनिक संतोष अलभर यांच्या चेहऱ्यावर व डोक्याला जबर मार होता.नाका तोंडात रक्तस्त्राव व माती गेल्यामुळे श्वसन क्रीया मंदावली होती.उपचारासाठी थोडा जरी उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते.संदीप घावटे व राजेंद्र ठुबे यांनी झटपट त्यांना हॉस्पीटलमध्ये आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकलो .
         

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या