शिरूर तालुक्यातील एवढ्या शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ

Image may contain: outdoor and nature
शिरूर, ता. 6 मार्च 2020: महात्मा जोतिराव कर्जमाफी योजना 2019 यात शिरूर तालुक्‍यातील दहा हजार 424 शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, जवळपास 90 कोटींचे सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे.


आजपर्यंत दहा कोटी रुपयांचे कर्जमाफ झाले आहे, तर लवकरच सर्व शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्जमाफ होणार असल्याचे शिरूर तालुका सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी सांगितले.


शिरूर तालुक्‍यातील बॅंकांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाची माहिती ती व थकीत कर्जाची माहिती ती महाराष्ट्र शासनाला दिली असून, यातून महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत खात्याची माहिती घेतली आहे. ही सर्व माहिती शासनाने घेऊन शासनाने दोन लाखांपेक्षा कमी असणाऱ्या थकित शेतकऱ्यांची कर्जमाफी शिरूर तालुक्‍यात केली आहे. या कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी शिरूर तालुक्‍यातील सर्वच गावातील मिळून दहा हजार 424 आहे. या दहा हजार 424 शेतकऱ्यांच्या मिळून 90 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्हा बॅंकेच्या शिरूर तालुक्‍यातील 27 शाखांमधून कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू केले असून, आजअखेर 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे बॅंकेचे विभागीय अधिकाऱयांनी सांगितले. प्रमाणीकरण झालेल्या 992 सभासद शेतकऱ्यांची नऊ कोटी चाळीस लाख रुपयांची रक्कम पहिल्याच दिवशी खात्यात जमा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात बारामती खालोखाल शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
  • पात्र शेतकरी : 9 हजार 401
  • कर्जमाफीची रक्कम : 80 कोटी 84 लाख
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या