Video: निमोणे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघड...

शिंदोडी, ता. ७ मार्च २०२० (तेजस फडके): निमोणे (ता.शिरुर) येथील मुख्य चौकात सांडपाण्यासाठी असणाऱ्या चेंबरचे झाकण गेल्या एक महिन्यांपासून रस्त्याच्या बाजूला पडलेले असुन त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.निमोणे येथे रस्त्याच्या कडेलाच ग्रामपंचायत कार्यालय असुनही ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांचे कोणाचेही लक्ष याकडे गेलेले नाही.त्यामुळे एखाद्या वाहन चालकाचा जीव गेल्यावर ग्रामपंचायत जागी होणार का...? असा प्रश्न वाहन चालकांनी केला आहे.शिरुर-तांदळी रस्त्यावर निमोणे हे महत्वाचे गाव असुन या ठिकाणी आठवडे बाजार,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,स्टेट बँक तसेच महावितरण चे उपकेंद्र आहे.तसेच निमोणे येथुन गुनाट,शिंदोडी,न्हावरे,आंबळे,करडे तसेच शिरुर येथे रस्ते जातात.त्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ असते.परंतु गावातील मुख्य चौकातच हे चेंबरच झाकण गेल्या एक महिन्यांपासून पडलेले असुनही ग्रामपंचायतीने त्याच्याकडे कानाडोळा केला आहे.


ग्रामसेवक नक्की करतात तरी काय...?
याबाबत निमोणे येथील ग्रामसेवक व्हि डी पोळ यांना विचारले असता.त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले की, निमोणे गावची यात्रा असल्याने १ महिन्यापुर्वी सांडपाणी वाहुन नेणारा चेंबर तुटला होता.त्यावेळेस नवीन चेंबरचे काम करण्यात आले होते.त्यावेळेस संबंधित ठेकेदाराने ते झाकण तिथंच ठेवले असण्याची शक्यता आहे.परंतु मला माहीत नाही मी माहीती घेतो.त्यामुळे ग्रामसेवक नक्की निमोण्यात करतात तरी काय...? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

No photo description available.

आई सरपंच कारभार मात्र मुलाच्या हातात...?
निमोणे येथील महिला सरपंच बेबीताई भालके यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता तो त्यांच्या मुलाकडे होता.त्याने मी बाहेर असुन मला याबाबत काहीच माहीती नसल्याचे सांगितले.त्यामुळे सरकारने महिलांना राजकारणात जरी ५० टक्के आरक्षण दिले असले तरीही "कारभारणीच्या नथीच्या आतुन कारभारीच तीर मारताना" दिसत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या