लोणीकंद मध्ये महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान...

Image may contain: 5 people, people standing and people on stage
लोणीकंद, ता. ७ मार्च २०२० (प्रतिनिधी): तालुका हवेली येथील मातोश्री सुलोचना प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात आला.लोणीकंद तालुका हवेली येथील मातोश्री सुलोचना प्रतिष्ठान यांच्या एच. डी. इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्रांगणामध्ये जागतिक महिला दिन निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद मा. अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या सौभाग्यवती व सोमेश्वर महिला ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन पुजाताई प्रदिपदादा कंद यांनी आवर्जून उपस्थित लावत महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या.आपल्या परिसरात आज महिला भगिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.समाजाला दिशा देण्याचे काम आपल्या महिला भगिनींचे आहे आणि याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे.यामुळे भविष्यातील सुसंस्कृत समाज उभा राहण्यासाठी मदत होईल असे कार्यक्रम प्रसंगी पुजाताई कंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी कार्यक्रम प्रसंगी मा. सरपंच लक्ष्मीताई कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या मा. चेअरमन धनुबाई लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या मंदाताई कंद, शैलजाताई कंद, शितलताई कंद, अश्विनीताई झुरुंगे, संगिताताई शिंदे, सुरेखाताई होले, जयश्रीताई झुरुंगे, पुजाताई खलसे, व्हा. चेअरमन आशाताई गरूड, संचालक अलकाताई वाळुंज, कविताताई कंद, व्यवस्थापक साधनाताई कंद, कल्पनाताई आगळे, पार्वतीताई राजेंद्र कंद, मंगलताई शिंदे, प्रितीताई शिंदे, कविताताई ढगे तसेच प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक अभिमानजी तराळ व अरुणाताई तराळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या