गोळीबाराचा बनाव करणारे पोलिसांच्या ताब्यात...

Image may contain: 6 people, people standing
शिरुर, ता. ८ मार्च २०२० (मुकंद ढोबळे): ता. शिरूर येथे गावठी कट्टा हाताळताना अचानक खटका दबल्या गेल्याने तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडामध्ये गोळी घुसली परंतु बेकायदेशीर कट्टा असल्याने जखमी तरुणाने त्याच्या दाजीच्या साह्याने टाकळी हाजी गुणवरे रस्त्यावर ओढ्याजवळ त अज्ञात लोकांचे भांडण सुरू असताना अचानक पळून जाण्यावर एकावर गोळीबार  केला त्यात मी रस्त्याने जात असताना ती गोळी चुकून मला लागली असा बनाव केला होता. परंतु, पारनेर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून जखमी तरुण व त्याच्या दाजी याच्याकडून हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालेले जखमी तरुण व त्यांच्या दाजीवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.संजय बाळू पवार (वय. २३ रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर) त्याचा दाजी दादाभाऊ किसन चव्हाण (रा. टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे )ही घटना ५ मार्च २०२० सकाळी १० वाजल्याचा सुमारास घडली आहे.याबाबत पारनेर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ५ मार्च सकाळी १० वाजता टाकळी हाजी गुणवरे रस्त्यावर दाजींना भेटण्यासाठी तरुण संजय पवार आला होता.त्यानंतर पुन्हा दाजींना भेटून तो आपल्या गावी राळेगण थेरपाळ येथे निघाला होता.परंतु, टाकळी हाजी गुणवरे रस्त्यावर ओढ्या जवळ ३ तरुण भांडण करत होते.यावेळी तेथून संजय पवार आपल्या मोटर सायकलवर जात होते.या वेळी भांडण करणाऱ्या तिघांपैकी कोणीतरी गोळीबार केला व ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडाला लागली असल्याचा बनाव करून संजय हा शिरूर येथील विध्नहर्ता हॉस्पिटल येथे दाखल झाला याचा साक्षीदार त्यांचे दाजी दादाभाऊ चव्हाण होते.


डॉक्टरांनी त्यांच्या उजव्या दंडामध्ये असलेली गोळी काढली.परंतु, पोलिसांना जबाब देताना वरील घटना जखमी तरुण सांगत होता.आणि, त्यांचा दाजी ही सांगत होता.परंतु, यात तफावत जाणवत असल्याने अहमदनगर ते पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस कर्मचारी निकम चौगुले, दिवटे डमळे गुणवरे टाकळी हाजी रस्त्यावर ओढ्याजवळ साक्षीदार दादाभाऊ चव्हाण यांच्याबरोबर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.परंतु, तेथे कोठेही काडतुसची पुंगळी वर रक्त सांडलेले दिसले नाही.त्यामुळे पोलीस चक्रावले होते.


जखमी तरुण वरील हाकिकत सांगत होता.अखेर पोलिसांनी जखमी तरुणाच्या दाजींना याबाबतची माहिती विचारली.त्यांच्या व जखमी तरुणाच्या माहितीत तफावत आढळत होती.अखेर साक्षी देणार दादाभाऊ चव्हाण यांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर साक्षीदार दादाभाऊ चव्हाण यांनी सत्य स्थितीची कबुली दिली.संजय हा मला भेटण्यासाठी टाकळी हाजी येथे आला होता.आल्यानंतर त्याच्याजवळील गावठी कट्टा त्याने मला दाखवत होता.हे गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गावठी कट्याचा ट्रीगर दाबले गेल्यामुळे त्याच्यातून गोळी सुटून ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडात घुसली असल्याची कबुली दिली.पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणे व गोळीबार करणे रघुनाथ जखमी तरुण संजय पवार, दादाभाऊ चव्हाण यांच्यावर दाखल करून पुढील तपास पारनेर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या