पुणे-नगर हा रस्ता वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक...

Image may contain: one or more people, people walking, people standing and outdoor
वडगावशेरी, ता. ८ मार्च २०२० (प्रतिनिधी): नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे रोड 'सेफ्टी ऑडिट' करण्यात आले होते.त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे.याचा विचार करून पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, BRT मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशा प्रमाणात बसेस तसेच ठिकठिकाणी उड्डाण पूल, गेडसेपरेटर, भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत,अशी माहिती माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.नगर रस्त्यावरील महत्त्वाचे प्रकल्पामध्ये गोल चौक उड्डाण पूल, गेडसेपरेटर, खराडी येथे उड्डाण पूल, गेड सेपरेटर, येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पूल, विश्रांतवाडी येथे उड्डाण पूल, बंडगार्डन जंक्‍शन ते मुंढवा पूल डीपी रस्ता या कामांचा समावेश आहे.तसेच, पुणे-नगर रस्ता व नॉर्थ मेन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन जंक्‍शन ते मुंढवा पूलापर्यंत सुमारे ३ किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.


याकामांसह शहरातील २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन असून त्यामध्ये कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाण पुलाचे विस्तारीकरणासह खराडी रॅडिसन हॉटेल, खराडी बायपास ते खराडी, राजाराम नगर, पठारी चौक, बीटी कवडे रोड आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.


विकास आराखड्यातील महत्त्वाचे येरवड्यात वाहतूक विषयक माहिती देणारा ट्रॅकि पार्क उभारण्यात येणार आहे. ११ शाळांतील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.शिवणे-खराडी रस्ता पूर्व आणि पश्‍चिम उपनगराला जोडणाऱ्या शिवणे ते खराडी या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.पुणे-नगर रस्त्यावरील लोहगाव, कळस, विश्रांतवाडी, संगमवाडी, येरवडा, धानोरी, वडगावशेरी, कल्याणीनगर, खराडी, चंदननगर या भागातील नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी भामा-आसखेड प्रकल्पातून २.६२ TMC पाणी उपलब्ध होणार आहे.


पुणे महानगरपालिकेत नव्याने ११ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.या गावांसाठी 'स्मार्ट व्हिलेज' ही योजना सुरू करण्यात येणार आहे.या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या योजनेत दिल्या  जातील.पहिल्या टप्प्यात लोहगाव आणि मुंढवा या २ गावांसाठी ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत हडपसर, खराडी, वडगाव या परिसरातील ८ सविस्तर प्रकल्प अहवालांना केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे.खराडी येथे ७८६ आणि हडपसर येथे ३४० सदनिका बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या