रामलिंग शाळेतील मुलींसाठी देण्यात आली ही भेट...

Image may contain: 5 people, people standing
शिरुर, ता. ८ मार्च २०२० (प्रतिनिधी): रामलिंग येथील शाळेत जागतिक महिला दिन शनिवारी साजरा करण्यात आला.जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत रामलिंग येथील शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी वेंनडिंग मशीन भेट देण्यात आले.या दिनानिमित्ताने शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबविला आहे.शाळेतील मुलींच्या सोयीसाठी शाळेतच सॅनिटरी वेंनडिंग मशीन बसविण्यासाठी येथील रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने हे मशीन शाळेस भेट देण्यात आले.यावेळी १ हजार सॅनिटरी नॅपकीन ग्रामपंचायतीच्या वतीने भेट देण्यात आले.केक कापून व मशीनची पूजा करून शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्ष राणी कर्डिले यांनी ग्रामीण भागातील मुलींची मासिक पाळीतमध्ये गैरसोय होऊ नये, मुलींचे आरोग्य चांगले रहावे, शाळेत मुलींची गळती थांबावी म्हणून हे मशीन शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने दिल्याचे सांगितले.या मशीनमध्ये ५ रुपयाचे नाणे टाकल्यास एक नॅपकीन मशीनमधून बाहेर येणार आहे.यामुळे शाळेतील मुलींची मोठीच सोय झाली आहे.


यावेळी सुभाष पोटघन यांनी मुलींना आरोग्य स्वच्छता यावर मागर्दशन केले.येथे १ ली १० वी पर्यंत शाळा असून या शाळेत मुलींचे प्रमाण जास्त आहे.मुलींनी हे मशीन शाळेतच बसवल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.कार्यक्रमास रामलिंगचे सरपंच नामदेव तात्या जाधव, ग्रापंचायत सदस्य यशवंतराव कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी दसगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माऊली रेपाळे, ग्रामसेवक भाऊसाहेब जगदाळे, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या