पुण्यामध्ये भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरु...

Image may contain: skyscraper and outdoor
पुणे, ता. ९ मार्च २०२० (प्रतिनिधी): पुणे मेट्रोच्या कृषी महाविद्यालय ते शिवाजीनगर स्थानक या सुमारे ६७५ मीटर लांबीच्या भुयारी मार्गाच्या खोदाईचे काम महामेट्रोने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.हे काम डिसेंबर ते जून या ६ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने केले होते.पण, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच हा बोगदा पूर्ण झाला असून दुसरा बोगदा ४०० मीटरचा असून,तोदेखील शेवटच्या टप्प्यात आहे.त्यामुळे पुढील आठवड्यापासून शिवाजीनगर ते सिव्हील कोर्ट या बोगद्याचे काम सुरू केले जाणार आहे.त्यासाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक पूर्तता महामेट्रोने केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.महामेट्रोकडून शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे.या कामाची सुरूवात महामेट्रोकडून डिसेंबर २०१९ पासून करण्यात आली होती.त्यासाठी २ महाकाय TBM द्वारे ही खोदाई सुरू करण्यात आली होती.शिवाजीनगर स्थानकापर्यंत २ स्वतंत्र बोगदे असून २ TBM द्वारे ही खोदाई सुरू आहे.त्यातील एक बोगदा सुमारे ६७५ मीटर तर दुसरा ४०० मीटरचा आहे.शहराच्या भूगर्भात असलेला बेसॉल्ट खडक लक्षात घेऊन महामेट्रोने या विशेष TBM मशिन तयार करून घेतल्या आहेत.


त्यानुसार, ही खोदाई जून २०२० मध्ये पूर्ण करण्यात येणार होती.मात्र, प्रत्यक्षात सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे काम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर दुसऱ्या बोगद्याचे काम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.त्यामुळे ३ महिने आधीच महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने ३ महिन्यांच्या कामाची वेळेची बचत झाली आहे.


शिवाजीनगर पर्यंतच्या खोदाईचे काम पूर्ण झाल्याने आता महामेट्रोकडून येत्या आठवड्यापासून (बुधवार) शिवाजीनगर ते सिव्हील कोर्टापर्यंतच्या बोगद्याच्या खोदाईचे काम हाती घेण्यात येणार आहे.हे कामही सुमारे ५०० मीटरचे असून,ते जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोकडून निश्‍चित करण्यात आले आहे.त्यासाठी पहिले काम पूर्ण केलेल्या TBM मशिनसाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक पूर्तता करण्यात आली आहे.मात्र, सोमवार आणि मंगळवारी होळी आणि धुलीवंदन असल्याने पुढचे काम थांबले असून बुधवार नंतर मशिन सिव्हील कोर्टच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या