अहमदनगर जिल्ह्यात ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह...

Image may contain: text
अहमदनगर, ता. ९ मार्च २०२० : अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत.या जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या खानापूर येथे महिला दिनाच्या दिवशीच एका ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.७ मार्च रोजी शेळ्या चारण्यासाठी गेलेली ३२ वर्षीय महिला देऊबाई गिर्हे ही संध्याकाळी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी रात्रभर तीचा शोध घेतला.मात्र, ती काही सापडली नाही.परंतु, ८ मार्च रोजी सकाळी तीचा मृतदेह गायरानावरील झुडपात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


भाऊ धोंडिबा गिर्हे याच्या फिर्यादीवरून, देऊबाई हिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.घटना उघडकीस आल्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.अज्ञात आरोपीला पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असून, पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या