महिला दिनानिमित्त शिक्षिकांचा व विद्यार्थिनींचा सन्मान...

Image may contain: 5 people, people sitting and people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ९ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला):  मुलींनी शालेय जीवनात चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याचे आवाहन प्राचार्य रामदास शिंदे यांनी केले.    
    
   
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षिकांचा व विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य शिंदे बोलत होते.या कार्यक्रमात वैशाली ढवळे, प्रा. रोहिणी नरके या शिक्षिकांनी तसेच शिवानी ताजने व वैष्णवी कांबळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमास उपप्राचार्य रामदास चव्हाण, पर्यवेक्षक सुभाष पाचकर, चंद्रकांत देविकर, दिगंबर नाईक, बाबुराव कोकाटे, सुरेश गंगावणे, शाम नाईक, संतोष परदेशी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले तर मंगल शिंदे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या