ज्योतिरादित्य शिंदेंनी कॉंग्रेस सोडण्याचे काय आहे कारण ?

Image may contain: 1 person, selfie and closeup
पुणे, ता. १० मार्च २०२० (प्रतिनिधी): लोकांची सेवा करण्याचे माझे ध्येय अद्यापही कायम आहे.पण या पक्षात राहून मी ते पूर्ण करू शकेन असे वाटत नाही,अशा आशयाचे पत्र देत माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.राज्यातील काँग्रेस अंतर्गत वादातून त्यांनी पक्ष सोडला.मात्र, त्यांनी आजच्याच दिवशी पक्ष सोडण्याचे कारण तुम्हाला माहित आहे का ?


काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांची आज (दि. १०) जयंती.माधवराव शिंदे ९ वेळा काँग्रेसचे खासदार होते.देशाचे रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.त्यांचे पूत्र व माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी या जयंतीच्याच मुहूर्तावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.गेली १८ वर्षे ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये कार्यरत होते.ज्योतिरादित्य शिंदे गेली काही महिने काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते.वडिलांचे निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य त्यांचा वारसा चालवत होते.पण राज्यातील काँग्रेस अंतर्गत वादातून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर शिंदे यांनी आज काँग्रेसच्या राष्टीय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला.


मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार विरोधात शस्त्र उपसल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकाळी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमित शहा यांच्या समवेत सुमारे एक तास भेट घेतली.त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या