मनोज अडसुळ यांची येरवडा कारागृहात रवानगी...

Image may contain: one or more people and people standing
पुणे, ता. १० मार्च २०२० (प्रतिनिधी): पुण्यातील एका डॉक्‍टरकडून ७५ लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज तुकराम अडसुळ उर्फ अत्रे (वय. ४८,रा. सॅलिसबरी पार्क) याची रवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जोंधळे यांनी येरवडा कारागृहात केली आहे.त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्यांच्या अर्जावर ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी डॉ.दिपक प्रभाकर रासने (वय. ६९, पर्वती) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.


ही घटना १८ ऑक्‍टोबर २०१९ ते ६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत घडली.याप्रकरणी ९ फेब्रुवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आतापर्यंत गुन्ह्यातील ४१ लाख २२ हजार ७७० रुपये जप्त करण्यात आले आहेत.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी अडसुळ याला न्यायालयात हजर केले.त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.तसेच, गुन्ह्यात हस्तगत केलेली रक्कम कोणाला देऊ नये,असा अर्जही त्यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.फीर्यादीच्या वतीने अ‍ॅड. सचिन ठोंबरे काम पाहत आहेत.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह जाधव काम पाहत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या