रांजणगाव देवस्थान कडून कोरोना बाबत जनजागृती...

Image may contain: 5 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): रांजणगाव देवस्थान कडून कोरोना बाबत जनजागृती केली जात असून परिसरात जनजागृतीचे फलक लावले आहेत.दर्शनासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांवर बारकाईने लक्ष सजवले जात आहे.तसेच मंदिरातील स्वछता व साफसफाई वाढविली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अ‍ॅड. विजयराज दरेकर यांनी दिली.    
           देशभरात प्राणघातक कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे.भारतामध्येही कोरोना विषाणूने बस्तान बांधायला सुरुवात केली आहे.रांजणगाव येथे असलेले पंचतारांकित MIDC मध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.त्यामुळे परिसरात विविध देशातील लोकांचे जाणे येणे आहे.तसेच श्री महागणपती मंदिरामध्ये संपुर्ण देशातून व परदेशामधून येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना बाबत सावधगिरी बाळगण्याच्या हेतूने व कोरोनाचा प्रसार रोखण्या साठी देवस्थान ट्रस्ट कडून दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे.


तसेच मंदिरामध्ये व मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेवर भर दिला जात आहे.त्याचप्रमाणे भाविकांनी गाभाऱ्यात गर्दी करू नये व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता राखावी.यासाठी भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अ‍ॅड. विजयराज दरेकर यांनी केले आहे.मंदिरामध्ये एरवी ३ वेळा स्वच्छता होत होती.ती आता दर २ तासांनी केली जात आहे.तसेच मंदिरातील स्टीलचे रेलिंग जंतुनाशके वापरून स्वच्छ केली जात असल्याचे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर  यांनी सांगितले.


कोरोना विषाणू विषयी फार काळजी करण्याची आवश्यकता नाही.तसेच भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवत  घाबरून जाऊ नये.मात्र, आवश्यक खबरदारी घेत स्वच्छता राखावी असे देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा अथर्व हॉस्पिटल चे संचालक डॉ. संतोष दुंडे यांनी आवाहन केले आहे.मंदिर परिसरामध्ये स्वच्छता राखण्याचे काम चोख पद्धतीने व्यवस्थापन करत आहे.तसेच मंदिर परिसरामध्ये स्वच्छता राखण्याचे जाहीर आवाहन करण्याचे फलक ही मंदिरामध्ये लावले असल्याची माहिती व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी दिली.भाविकांचाही या जनजागृतीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी वर्गातून ही समाधान व्यक्त केले जात आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या