विद्यार्थिनींनी केला रंगोत्सवाचा बेरंग, पाठीवर लिहिले अपशब्द...

Image may contain: 1 person, standing and outdoor
कोलकाता, ता. ११ मार्च २०२० : दरवर्षी होळी हा सण कोलकाता मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षीही कोलकाता मध्ये असलेल्या रवींद्र भारती विद्यापीठात या उत्सवाची मोठी धूम पहायला मिळाली.होळीसाठी इथे मोठी तयारीही केली गेली होती.पण कोलकाता मधील प्रसिद्ध रवींद्र भारती विद्यापीठात एक आगळा वेगळा प्रकार समोर आला आहे.या विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शरीरावर अपशब्द लिहिले आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.व्हायरल झालेल्या फोटोमधील विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध गाण्याबद्दल अपशब्द लिहिलेले दिसल्यामुळे त्यावरून वादाला तोंड फुटलं आहे.या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विद्यार्थिनींनी त्यांच्या पाठीवर बंगाली भाषेत 'धिक्कार' असं लिहिलं आहे.याशिवाय अश्लील भाषेत काही मजकूरही काही जणांनी रंगवला आहे.हा फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून मोठा वाद होत आहे.

या विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर आणि बंगाली संस्कृतीचा होत असलेला अपमान,यामुळे या सर्व प्रकाराची निंदा करत असल्याचं या फोटोंमधून समोर आलं आहे.या फोटोंमध्ये ४ महिलांनी त्यांच्या पाठीवर काही अपशब्द लिहिल्याचं दिसत आहे.साडीमध्ये दिसत असलेल्या या विद्यार्थिनींनी टागोर यांच्या गीताबद्दल अपशब्द लिहिलेले आहेत.आता या सर्व वादानंतर विद्यापीठातील प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.या सर्व प्रकाराचा अधिक तपास सध्या विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे,असं पोलिसांनी सांगितलं आहे.या सर्व प्रकाराबद्दल पोलिसांनी विद्यार्थ्यांची चौकशी सुद्धा केली आहे.चौकशी केल्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सोडण्यात आलं.या सर्व प्रकारानंतर विद्यापीठाचे कुलगुरू सव्यसाची बसू रायचौधरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी राजीनामा दिला.

त्यांनी त्यांचा राजीनामा शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडे पाठवला आहे.हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टागोरप्रेमींनी कडक शब्दांत टीका केली.सोशल मीडियावर टागोर समर्थकांनी विद्यापीठातील या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.काही जणांनी या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाका अशी मागणीही केली आहे.


फक्त विद्यापीठातूनच नाही तर इतर संघटनांनी सुद्धा या वादात उडी घेतली आहे.फक्त सोशल मीडियावर नाही तर तिथल्या स्थानिक टागोर समर्थकांनी सुद्धा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.इतकंच नाही तर पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सुद्धा या घटनेवर टीका केली आहे.विद्यापीठातील विद्यार्थी खरंच त्यांच्या वागण्यातील सभ्यता विसरून गेले आहेत का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी टीका केली.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या