कचरा समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

Image may contain: 3 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): प्लास्टिक व थर्माकोलच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून कचरा समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्रशांत अवचट यांनी व्यक्त केले.
        


तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात 'पर्यावरण संवर्धन' या विषयावर प्रशांत अवचट बोलत होते.पर्यावरण रक्षण, झाडे लावून व्यक्तींचा वाढदिवस साजरा करणे, वृक्षारोपण करणे आदी विषयांवर संवाद घडवून उपक्रम राबवण्याचे या मेळाव्यात सर्वानुमते ठरले.या कार्यक्रमास ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, विलास पाटील, प्रभाकर मुसळे, दत्तात्रय गायकवाड, जगदीश राऊतमारे,  नारायण भुजबळ, सोपान धुमाळ, बाबुराव साकोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव भुजबळ यांनी केले तर मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या