भुजबळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर...

Image may contain: 18 people
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० ( एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी होळी पौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर ( १६४६ मीटर) सर केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
          तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भुजबळ विद्यालयातील गिर्यारोहण व निसर्गाची आवड असणाऱ्या इयत्ता ९ वी मधील ठराविक २० विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.या मोहिमेमधून मुलांना सह्याद्रीमधील प्राकृतिक रचना, शिखरे, नैसर्गिक वनसंपत्ती पर्यावरण व त्यांच्या समस्या या विषयाची माहिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मिळविता आली.आपल्या राज्यातील नैसर्गिक स्थळांची माहिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मिळविणे या हेतूने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.


अतिशय थंड हवामान, बोचरी थंडी, वादळी वारा अशा कठीण परिस्थितीमध्ये सुध्दा ही मोहीम पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ व अध्यक्षा मंगलताई भुजबळ यांनी सर्वांचे कौतुक केले.या मोहिमेत विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयातील भूगोल विषयाचे शिक्षक किरण झुरंगे, प्रशिक्षक राजेंद्र हंबीर, प्रशांत भुजबळ आदी सहभागी झाले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या