कारेगाव येथे अपहरण करुन खून, २ आरोपींना अटक...

Image may contain: 1 person
रांजणगाव गणपती, ता. ११ मार्च २०२० (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथून मंगळवार (दि. १०) रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा छडा लावून १२ तासात आरोपींना अटक करुन बेड्या ठोकल्या.विनोद अनिल जाधव (वय २९) रा. बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) आणि आणि सनी सुनील जाधव (वय १९) रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.कारेगाव येथील दादाभाऊ भाऊसाहेब नवले (वय ५१) यांचे मंगळवारी (दि. १०) रोजी सायंकाळी नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या अल्टो मधून अपहरण करण्यात आले होते.याबाबत रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या CCTV फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आणि तात्काळ विनोद अनिल जाधव आणि सनी सुनील जाधव या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.


परंतु, आरोपी काहीच बोलण्यास तयार नव्हते.त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी दादाभाऊ नवले यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन कमरेच्या पट्ट्याने त्यांचा गळा आवळून त्यांचा खून केल्याचे कबूल केले.तसेच त्यांची बॉडी शिरुर शहराजवळील घोडनदी पात्रात पाण्यामध्ये टाकून दिली असल्याचे सांगितले.त्यांनतर पोलिसांनी आरोपींच्या सांगण्याप्रमाणे घोडनदी पात्रात शोध घेतला असता, दादाभाऊ नवले यांची मयत बॉडी सापडली. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.


सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील,पुणे ग्रामीण बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,दौंडच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस हवालदार नानासाहेब काळे, तुषार पंदारे, संतोष घावटे, पोलीस नाईक अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, चंद्रकांत काळे, प्रफुल्ल भगत, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद देवरे, उद्धव ,भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या