पुण्याजवळील या भागासाठी होणार स्वतंत्र महानगरपालिका...

Image may contain: sky and outdoor
मुंबई, ता. १२ मार्च २०२० (प्रतिनिधी): पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली.


आमदार अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे.पुणे व पिंपरी चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे.परंतु, या कामाला गती देण्याची गरज आहे असेही पवार यांनी सांगितले.



पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे.वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा २.५ MLD क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव ५ MLD पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.पुणे-शिरूर-अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४ पदरी रस्त्याचे ६ पदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला १५ कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत.तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील ८ गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या