पिंपरी चिंचवडमध्ये धावत्या टेम्पोत महिलेवर बलात्कार...

No photo description available.
पिंपरी चिंचवड, ता. १२ मार्च २०२० (प्रतिनिधी): पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये धावत्या टेम्पोत महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एका धावत्या टेम्पोत २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केला गेला आहे.टेम्पो चालक आणि क्लिनरने हे कृत्य केलंय.आळंदी येथून आलेल्या या पीडितेवर बलात्कार करुन एक्स्प्रेस वेवर सोडलं गेलं.या प्रकरणावर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पेरणे फाटा येथे सोडतो असं सांगून या नराधमांनी १० फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता दुचाकीवर बसवलं आणि तिथून पुढे जाऊन दुचाकी ठेवून एका टेम्पोत बसवलं आणि पुढे मोशी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, पुनावळे असं फिरवून एक्स्प्रेस वेवरील गहूंजे क्रिकेट स्टेडियम समोर पहाटे ४ वाजता सोडलं आणि दोघेही नराधम पसार झाले.या दरम्यान एकाने तिच्यावर बलात्कार केला.तर दुसऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला.तिथून ही महिला शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोलिसांकडून ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेचं आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानं रागात ती घराबाहेर पडली होती.नंतर ती घरी परतत असताना तिच्या सोबत ही घटना घडली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या