महिला बचत गटांची अस्मिता भवनची मागणी...


सादलगाव,ता. १२ मार्च २०२० (संपत कारकूड): सादलगाव(ता.शिरुर) येथील २९ महिला बचतगटातील महिलांनी एकत्रित मिटिंग घेणे,प्रशिक्षण घेणे तसेच इतर अनेक कामांसाठी हक्काची इमारत पाहिजे अशी मागणी सर्व महिलांनी पुणे जिल्हा परिषदेच्या दुग्ध व पशुसंवर्धन खात्याच्या सभापती सुजाता पवार यांच्याकडे केली.निमित्त होते तात्पुरत्या स्वरूपातील गावातील जुन्या शाळेच्या इमारतीमधील एका खोलीचे  ग्रामसंघाचे कार्यालयाच्या उद्घाटन.महिला बचत गटाची चळवळ सगळीकडेच जोर धरीत असून प्रत्येक गावात महिलांसाठी एकत्रित येण्यासाठी हक्काची जागा अथवा कार्यालयाची गरज आहे.बचत गटातील एकूण ३०० महिलांना बसन्यासाठी जागाच नव्हती.यापूर्वी ग्रामपंचायात कार्यालयात व राममंदिरामध्ये महिलांना बसून मिटिंग घाव्या लागत होत्या.ही समस्या ग्रामपंचायतीने सोडविण्यासाठी आपल्याकडील जुन्या शाळेची इमारत बचत गटाला तात्काळ देण्याचे मान्य केले आणि गावातील महिला बचत गटांचा प्रश्न काही अंशी का होईना दूर झाला.


गावामध्ये महिला बचत गटाची चळवळ सध्या जोर धरू लागली आहे.गावातील एका महिला बचत गटाने तर घरगुती वापराच्या फिनाईल,हँडवॉश,शौचालय  साफ करण्याची उत्पादने तयार केली असून त्याचे मार्केटिंग करण्यासाठी स्वतः सुजाता पवार यांनी पुढाकार घेण्याचे आश्वासन महिलांना दिले आहे.या कार्यक्रमास सरपंच निर्मला मिठे,सदस्या निर्मलाताई केसवड,रुख्मिणीबाई अडसूळ,महिला गटांच्या अध्यक्ष,सचिव तसेच शिरुर महिला संघाच्या प्रमुख ब्राह्मणे सुषमा सुतार,उज्वला कोंडे,कल्पना गायकवाड,मनीषाताई गायकवाड,अश्विनी केसवड,आशा काशीद या महिला उपस्थित होत्या.


गावचे  तंटामुक्ती समितिचे अध्यक्ष संतोष पवार, घोडगंगा स. सा. का.चे संचालक कांतीलाल होळकर, गावाचे उपसरपंच देविदास होळकर,माजी सरपंच संतोष जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन देविदास होळकर यांनी केले.  

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या