शिक्रापुरात ट्रकच्या धडकेत पत्नी ठार तर पती जखमी...

Image may contain: text
तळेगाव ढमढेरे, ता. १२ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): शिक्रापूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी चाललेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
         शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने निवृत्ती कुटे व त्यांच्या पत्नी सुभद्रा कुटे हे दोघे दुचाकीवारून त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शिक्रापूर येथे चाकण बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकची ( क्र. MH 12 PQ. 4808 )  कुटे यांच्या दुचाकीला धडक बसली.यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुभद्रा कुटे या ट्रकच्या बंपरला अडकून पुढे ओढल्या गेल्या असताना सुभद्रा यांच्या डोक्याला व पोटाला मार लागला तर निवृत्ती हे गंभीर जखमी झाले.


दोघांनाही उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात नेले त्यांनतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, उपचारादरम्यान सुभद्रा निवृत्ती कुटे यांचा मृत्यू झाला.याबाबत निवृत्ती विठ्ठल कुटे (रा. सुखवस्तू, भोसे, ता. खेड, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ( क्र. MH 12 PQ. 4808 ) ट्रकच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या