तळेगाव ढमढेरे येथे कोरोना विषयी जनजागृती...

Image may contain: 9 people, people sitting
तळेगाव  ढमढेरे, ता. १२ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): कायदा व सुव्यवस्था ठेवत असताना सामाजिक व आरोग्य विषयक सलोखा देखील राहणे गरजेचे असून कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.
     
      
तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर परिसरात अद्याप कोणतीही व्यक्ती कोरोना बाधित नाही.परंतु, नागरीकांकडून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत.या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शेलार बोलत होते.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.तसेच याबाबत योग्य जनजागृती करण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवश्यक ती जनजागृती सर्व गावांमध्ये तसेच वाड्या वस्त्या आणि गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणार असून याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करणार असल्याचे देखील पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.


याप्रसंगी शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद, डॉ. सुरेश लवांडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. विशाल व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार आदी उपस्थित होते. 


कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आरोग्यासाठी देखील पोलीस प्रशासन पुढाकार घेत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे तसेच शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी सांगितले.याप्रसंगी कोरोना जनजागृती बाबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून नागरिकांनी गर्दीमध्ये जाने टाळून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या