शिक्रापूर येथून २८ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता...

Image may contain: 1 person, closeup
तळेगाव ढमढेरे, ता. १२ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): शिक्रापूर येथून २८ वर्षीय विवाहित महिला अचानक घरातून बेपत्ता झाली असून बेपत्ता महिलेच्या पतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

           
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात राहणारे विजय खरात हे सकाळी कामाला गेलेले असताना त्यांची पत्नी घरी होती.रात्री ११ वाजल्याच्या सुमारास खरात हे कामावरून घरी आले असता त्यांना घरामध्ये पत्नी दिसली नाही.त्यानंतर त्यांनी पत्नी ज्योती हिचा आजूबाजूला तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला असता त्यांना पत्नी कोठेही मिळून आली नाही.याबाबत बेपत्ता महिलेचे पती विजय दामू खरात (रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.बेपत्ता ज्योती खरात या महिलेचे वर्णन रंग गोरा, उंची ३ फुट ९ इंच, गोल चेहरा, काळे व लांब केस, गळ्यात मनीमंगळसूत्र, नाकात चमकी, कपाळावर टिकली, अंगात काळ्या रंगाची साडी असे असून बेपत्ता महिलेबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९८५०५८६३३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहेत.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या