काय आहे अजित पवारांना गाढा विश्वास...

Image may contain: 1 person, standing and closeup
मुंबई, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन,कमलनाथ सरकारला मोठा झटका दिला.मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा हा दाखला देत.एक ना एक दिवस चूक होईल.भाजप आणि विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातही तसंच होईल असा दावा करत आहेत.कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रातही येईल,असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.याचाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी केली.यावेळी बोलताना ते म्हणाले,‘आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही असं सांगत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.पुढे बोलताना ते म्हणाले,‘आपल्याकडचाच कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही याची काळजी घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.तुम्ही कितीही म्हटले चुकी झाली,पण आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो चुकीला माफी नाही,असं अजित पवार म्हणाले.


राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची ५ वर्ष तिथं काढलीत तरी चालतील.असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे.नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील.आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही.पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा.बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा,’असं अजित पवार म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या