रंग लावू दिला नाही म्हणून तरुणाच्या डोक्‍यात घातली फरशी...

Image may contain: one or more people
पुणे, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): रंग लावू दिला नाही म्हणून एका तरुणाच्या डोक्‍यात व बरगडीत फरशी मारुन जखमी करण्यात आले.यामध्ये तरुणाच्या २ बरगड्या फ्रॅक्‍चर झाल्या आहेत.ही घटना रेसिडन्सी क्‍लब येथे धुलिवंदनच्या दिवशी घडली.याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सिकंदर अजरत शेख(वय २१), अतिक हुसेन सय्यद(वय २१), अल्लाहबश अब्दलहमीद जमादार(वय १८) आणि रोहन विनोद रेड्डी (वय २२,सर्व रा. केशवनगर, मुंढवा) यांना अटक केली आहे.तर जुबेर इमामसाहब कडलगी (वय ३२, रा. कौसरबाग) यानी फिर्याद दिली आहे.यातील फिर्यादी रेसीडन्सी क्‍लब येथे मित्र निलेश नायरसोबत धुलवडनिमीत्त रंग खेळण्यासाठी गेला होता.


रंग खेळल्यानंतर नायर निघुन गेला.मात्र, नायरसोबत आलेले त्याचे काही मित्र तिथेच थांबले होते.त्यांनी पुन्हा फिर्यादीला रंग लावण्याचा प्रयत्न केला.मात्र, फिर्यादीने रंग लावण्यास नकार दिल्याने त्यांच्यात बाचाबाची होऊन भांडणे झाली.याचा राग मनात धरुन चौघांनीही तेथे पडलेली फरशी फिर्यादीच्या डोक्‍यात आणी बरगडीत मारली.यामध्ये फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या दोन्ही बरगड्या फ्रॅक्‍चर झाल्या.याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या