या कारणावरून सूर्यवंशीची रिलीज डेटही पुढे ढकलली...

Image may contain: 4 people, people standing
मुंबई, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाचा परिणाम आता सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे.वैद्यकीय, पर्यटन, आर्थिक अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हाहाःकार माजवणाऱ्या कोरोनामुळे आता मनोरंजन विश्वालाही ग्रासल्याचं चित्र निर्माण होत आहे.आधीच महाराष्ट्रात होऊ घातलेले १०० वे मराठी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे.आता अजून एका कलाकृतीची भर पडली आहे.अक्षय कुमार,अभिनित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा चित्रपट येत्या गुढी पाडव्याला प्रदर्शित होणार होता.मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहून चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वीच सूर्यवंशीचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.अक्षय कुमार यात सूर्यवंशी या पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात झळकणार आहे.त्याला सोबत देण्यासाठी सिम्बा आणि सिंघमही चित्रपटात झळकणार आहे.


चित्रपटाची कथा आणि तिचं सादरीकरण पाहता रोहित शेट्टी पुन्हा एकदा तिकीटबारीवर धमाका करणार असं दिसत आहे.या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा अशी कलाकारांची मांदियाळी आहे.विशेष म्हणजे यात जॅकी श्रॉफही एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.पोलिसांच्या आयुष्यावरचे सिंघम, सिम्बा असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीने यंदा त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटासाठी मात्र गुढी पाडव्याचा मुहूर्त निवडला होता.


सूर्यवंशी हा चित्रपट २०२० मध्ये ईदला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.सलमान खानचे हल्लीचे सगळे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात.त्यामुळे सलमान खानचे चाहते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारवर संतापले होते.कारण बॉक्स ऑफीसवर सूर्यवंशी आणि सलमानच्या चित्रपटात संघर्ष झाला असता.पण, रोहितने हा चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं.मात्र, आता त्याच्या या मनसुब्यावर कोरोनाचं सावट घोंघावत असल्याने रोहितने सुरक्षेला प्राधान्य देत कोणताही धोक न पत्करण्याचं निश्चित केलं आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या