Video: शिरूरमधील करोना संशयित 'असा' आला अहवाल

शिरूर, ता. 14 मार्च 2020: शिरूर शहरात करोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अफवांना ऊत सुटला आहे. फिरण्यासाठी गेलेले दोघे दुबईहून परतले आहेत. त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून, यात कुठलेही लक्षणे आढळून नाही, अशी माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कैलास बत्ते यांनी दिली.शिरूरच्या दाम्पत्यावर आणखी काही दिवस लक्ष ठेवणार आहे. हे दाम्पत्य शिरूर येथील रहिवासी असून, दुबई येथे फिरण्यासाठी गेले होते. तीन मार्च रोजी दुबईवरून ते शिरूरला आले होते. त्या दोघांना पुण्याला घेऊन गेले आहेत अशी चर्चा होती; परंतु शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली त्यांना कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही या त्यांना आणखी सहा दिवस निरीक्षणाखाली ठेवणार येणार आहे.
दरम्यान, शिक्रापूर परिसरात एक संशयित आढळला आला होता. मात्र, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पण, त्याच्यावरही नजर ठेवण्याचे काम शासकीय हॉस्पिटल कर्मचारी करीत आहे. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी यांना मास्क लावण्यात सांगितले आहे.


दरम्यान, शिरूर तालुक्यातील नागिरकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, अशी माहिती रांजणगाव येथील श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे यांनी दिली.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या