तळेगाव ढमढेरे येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी...

Image may contain: 4 people, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता १४ मार्च २०२० (एन बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथे शिवजयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते व परिसर गजबजून गेला होता.तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंती उत्सवानिमित्त शिवनेरीहुन तळेगाव ढमढेरे पर्यंत शिवज्योत आणण्यात आली.शिवप्रतिष्ठानच्या वतीने याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले.शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.या पालखी सोहळ्यासाठी अकलूजहुन लक्ष्मीनारायण हलगी ग्रुप व  परिसरातील भजनी मंडळ सहभागी झाले होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात ही पालखी मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक  तळेगाव ढमढेरे येथील मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणण्यात आली.शिव जयंतीनिमित्त सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे 'छत्रपती शिवरायांची युद्धनीती-सद्यस्थिती आणि युवकांची जबाबदारी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना सोलापूरकर म्हणाले की राष्ट्राच्या संरक्षणासाठी सैनिक सीमेवर लढत आहेत.युवकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रबांधणीत सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.


वाढते अत्याचार रोखणे ही युवकांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी बोलताना सोलापूरकर यांनी सांगितले.प्रतिष्ठानच्यावतीने दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या 'गड किल्ले बनवा' स्पर्धेतील विजेत्यांना सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :-संग्राम ढमढेरे (प्रथम), शुभम कोल्हे (द्वितीय), सृष्टी आरोह (तृतीय), राजवर्धन ढमढेरे (चतुर्थ).शिवजयंती उत्सव संपन्न होण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या