प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी आमदारांनी केली ही मागणी

Image may contain: 1 person, sitting
पुणे, ता. १५ मार्च २०२० (प्रतिनिधी): चासकमान प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील भूसंंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असून धरणग्रस्तांना जमिन वाटप करताना प्रशासनाचा अनागोंदी कारभार शेतकऱ्यांनी उजेडात आणला आहे.या प्रकरणाची चौकशी करून शिरूर- हवेली तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी आमदार अ‌ॅड. अशोक पवार यांनी पुनर्वसनमंत्री यांच्याकडे केली आहे.आमदार पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह वडेट्टीवार यांची भेट घेतली.या वेळी डॉ. धनंजय खेडकर,सुर्यकांत वाघोले,मच्छिंद्र उमाप,भाऊसाहेब कदम,गौरव जाधव,राजाराम ढमढेरे,विकास हरगुडे,आप्पा दरेकर,बाळासाहेब चव्हाण,ज्ञानोबा जकाते,आदी शेतकरी उपस्थित होते.शिरूर तालुक्यातील चासकमान लाभ क्षेत्रात वीर,भामा,आसखेड,उजनी,गुंजवणी,टेमघर,कळमोडी आदी प्रकल्पांचे पुनर्वसन करण्यासाठी चुकीच्या व अधिक संपादित केलेल्या जमिनींचे वारेमाप,बेकायदा नियम आणि कायदे धाब्यावर ठेवून वाटप केले.


काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या नावाखाली लुबाडली आहेत.भूसंपादनामध्ये तात्कालीन भूसंपादन व पुनर्वससन,अपात्र प्रकल्पग्रस्त एजंट आदींची मोठी साखळी आहे.ही बाब आमदार पवार आणि शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या