कोरोनाइफेक्ट मुळे पुण्यातील ही ठिकाणे बंद...

Image may contain: one or more people, people walking and crowd
पुणे, ता. १६ मार्च २०२० (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून ३ दिवस बंद राहणार आहे.विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.तसेच शनिवारवाडाही रात्रीपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काल मुंबईमध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात ८ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी,असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला.या ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे.


पुण्यातील तुळशीबाग हे विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण आहे.तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन पुढील ३ दिवस तुळशीबाग बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्यासाठी पालिकेने १२५ पथकं तयार केली असून एका पथकामध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचं कामही पथक करणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या