राणा दुग्गबती या अभिनेत्रीसोबत होता नात्यात...

Image may contain: 1 person, beard
मुंबई, ता. १६ मार्च २०२० (प्रतिनिधी): बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले.त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले.राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.राणा एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता.पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले.राणानेच ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली होती.बाहुबली या चित्रपटातील राणा दग्गुबती, प्रभास आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती.या कार्यक्रमात राणाला त्याच्या खाजगी आयुष्याविषयी करणने विचारले होते.


राणा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन हे नात्यात असल्याची अनेक वर्षं चर्चा होती.पण त्यांनी याविषयी काहीही न बोलणेच पसंत केले होते.करणने त्याला त्रिशाबद्दल विचारले असता त्रिशा ही माझी अनेक वर्षांपासून खूप चांगली फ्रेंड असल्याचे त्याने सांगितले होते.एवढेच नव्हे तर काही वर्षं आम्ही नात्यात होतो.पण काही कारणास्तव आमचे ब्रेकअप झाले अशी देखील कबुली राणाने दिली होती.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

राणा काही वर्षांपूर्वी नं १ यारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता.या कार्यक्रमातील एका भागात राणाने सांगितले होते की, त्रिशा आणि मी नात्यात होतो.पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे आम्ही वेगळे झालो.तुम्ही दोघेही चित्रपटसृष्टीत असाल तर तुम्हाला एकामागोमाग अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करावे लागते.यामुळे तुमचे आयुष्य प्रचंड बिझी असते.त्यामुळे काही नाती टिकत नाहीत.

त्रिशाने काही वर्षांपूर्वी चेन्नईमधील वरुण मॅनियन या व्यवसायिकासोबत साखरपुडा केला होता.पण काही काळानंतर त्यांचा साखरपुडा मोडला.त्रिशा तिच्या खाजगी आयुष्याविषयी न बोलणेच पसंत करते.राणा लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.या चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन कमी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या