कोरोना मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ...

Image may contain: crowd, stadium and outdoor
नाशिक, ता. १६ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम जसा जनजीवनावर होताना दिसत आहे.तसाच तो अर्थव्यवस्था आणि बाजार पेथांवारही होताना दिसत आहे. कोरोनाच्या भीतीचे सावट आता बाजार समित्यांवर देखील होत आहे.राज्यात कोरोनामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे.कांदा निर्यात खुली करण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली.त्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली.रविवार (ता. १५) पासून कांद्याची निर्यात बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरु झाली.मात्र, शनिवारच्या तुलनेत आज (१६ मार्च) लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात २५० रुपये प्रति क्विंटल घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.गेल्या १३ दिवसांपूर्वी कांद्याची निर्यात बंदी उठणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं होतं.तेव्हापासून कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.मात्र, या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला.मात्र, बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाल्यानं कांद्याचा बाजार भाव प्रति क्विंटल २५० रुपयांनी घसरला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

लासलगाव बाजार समितीत १६०० वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.उन्हाळी कांद्याला जास्तीजास्त १७९०, सरासरी १६०० तर कमीतकमी १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.लाल कांद्याला कमाल १७८०, सरासरी १५०० तर कमीतकमी ९०० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला, अशी माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या