रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरी उघड...

Image may contain: text that says 'CRIME'
रांजणगाव गणपती,  ता. १७ मार्च २०२० (तेजस फडके): रांजणगाव MIDC येथून (दि. १२ फेब्रुवारी)रोजी  रात्री ११:४६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पायी चालले असताना एका नंबर नसलेल्या सिल्वर रंगाच्या कारमधील २ व्यक्तींनी  LG कंपनी चा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, ATM कार्ड व मोबाईल जबरी चोरी करून एकूण किंमत रुपये ३७००/- रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.



या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना  स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने  सदर गुन्ह्यामधील आरोपी असिफ आयुब शेख (वय २४ वर्षे रा. केडगाव, सातपुतेमळा जि. अहमदनगर)यास  ताब्यात घेतले.यावेळी  सदर आरोपी हा  गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाइल वापरत असल्याचे तांत्रिक माहितीवरून दिसून आले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिमन, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, पोलीस नाईक जनार्दन शेळके, राजू मोमीन , क्षिरसागर, अक्षय जावळे यांनी केलेली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या