पिंपरी येथे तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

No photo description available.
पिंपरी, ता. १७ मार्च २०२० (प्रतिनिधी): तडीपार गुन्हेगाराकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली आहे.



अविनाश बाळू धनवे (वय २८, रा. वडमुखवाडी, च-होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई आशिष बनकर आणि गणेश कोकणे यांना माहिती मिळाली.की, तडीपार गुन्हेगार अविनाश धनवे हा लग्नाच्या कार्यक्रमासाठी आळंदी येथील अगस्ती मंगल कार्यालय येथे आला आहे.त्याच्याकडे पिस्तूल आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धनवे याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे असा ३०,८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.धनवे त्याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात ३ आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.त्याने तडीपारीचा आदेशाचा भंग करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी आशिष बनकर, गणेश कोकणी, सुधीर डोळस, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या