पाबळ येथील पद्मणी जैन मंदिर दर्शनासाठी बंद...

No photo description available.
शिक्रापूर, ता. १७ मार्च २०२० (प्रतिनिधी): पाबळ (ता . शिरूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पद्ममणी जैन मंदिर येथील दर्शन भाविकांसाठी मंगळवारी (दि. १७) पासून बंद करण्यात आले आहे.सध्या जागतिक पातळीवर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेत पद्ममणी जैन तीर्थ पिढी यांनी हा निर्णय घेतला आहे.संपूर्ण देशातून पाबळ येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पाबळला न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शनासाठी येऊ नये.हजारो भाविक पाबळ येथे शनिवार-रविवारसह त्याचबरोबर दररोज जैन मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात.महाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्य प्रदेश व संपूर्ण देशातूनच याठिकाणी जैन भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात पुणे-मुंबई त्याचबरोबर नाशिक औरंगाबाद याठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर भाविक देवदर्शनासाठी पाबळ येथे येत असतात.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

त्याचबरोबर मुख्यता गुजरात व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर जैन भावी पाबळ येथे दररोज दर्शनासाठी येत असतात.येथील ट्रस्टने आज १७ मार्चपासून मंदिरातील दर्शन बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी बंद केले असून नुकतेच मंदिराचे संपूर्णपणे निजंर्तुकीकरण करण्यात आले.त्याचबरोबर येथे असलेले भोजनशाळा,धर्मशाळा देखील निजंर्तुकीकरण करून शासनाच्या पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे ठरवले आहे. याबाबत लांबून येणाऱ्या भाविकांनी देखील पाबळ येथे न येण्याचे आव्हान पद्मनी जैन श्वेताम्बर तीर्थ पिढीचे अध्यक्ष भरत नागोरी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या