कोरोनामुळे सरपंच आरक्षण ढकलले पुढे...

केंदूर, ता. 18 मार्च 2020 (विशाल वर्पे): पुणे जिल्ह्यातील मार्च २०२० ते मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या  तब्बल १ हजार २८६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ मार्च रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार होते. मात्र, कोरोना रोगाच्या पार्शवभूमीवर आरक्षण सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून शिरूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतचा नियोजित २७ मार्च रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार हा एकमेकांच्या संसर्गाने वाढत जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सभा, यात्रा, सामाजिक कार्यक्रम, मेळावे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना ३१ मार्च पर्यंत बंदी घातल्याने २७ मार्च रोजी तालुक्याच्या मुख्यालयात मोठ्या प्रमाणात विविध राजकीय प्रतिनिधी इतर ग्रामस्थ उपस्थित राहण्याची व गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील आरक्षण सोडतीची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या