हिंदी अध्यापक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Image may contain: 7 people
तळेगाव ढमढेरे, ता. १८ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व हिंदीच्या प्रचार-प्रसार कार्यात सक्रिय सहभागी असलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.
           


शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुर्यकांत पलांडे होते.या कार्यक्रमास जि. प. सदस्या कुसुम मांढरे, माजी विस्ताराधिकारी एकनाथ झेंडे, सोपानराव धुमाळ, शिरूर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष संजीव मांढरे, सुधाकर भोंग, मिठू सोनवणे, नसीमा काझी, शंकर गाडेकर, संदीप जगताप, अर्जुन चव्हाण, महेश शेलार, राजेंद्र मिसाळ आदी उपस्थित होते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा पुढील प्रमाणे :- प्रेमचंद आदर्श शिंदे अध्यापक पुरस्कार : रंजना पिंपळे (सरदार दस्तूर हायस्कूल पुणे), माया कोथळीकर (ना. दा. ठाकरसी विद्यालय पुणे), उस्मान मुलाणी ( बाबिर विद्यालया रुई), किरण दरवडे ( फ्रेंड्स स्कूल कोरेगाव भीमा), रेश्मा घार्गे ( बालाजी विद्यालय शिरूर), शिक्षा सेवा पुरस्कार : रामदास थिटे (छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक), प्रविण जगताप (पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी), शंकर घोरपडे (स्वामी विवेकानंद विद्यालय दापोडी), गीता पाटील (शिवाजी मराठा हायस्कूल पुणे).आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार : सूर्यभान बर्वे (स्वा. से. शं. बा. डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे), दिलीप पवार ( विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी), उपक्रमशील शाळा पुरस्कार : स्वा. से. शं. बा. डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी, माध्यमिक विद्यालय सणसवाडी. या कार्यक्रमात हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


हिंदी भाषा ही सर्व भारतीयांना जोडते.मराठी मातृभाषा तर हिंदी राष्ट्रभाषा म्हणून दोन्हींचाही गौरव होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना जि. प. सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्‍त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव मांढरे यांनी केले.शांताराम खामकर व शारदा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिता पिंगळे यांनी आभार मानले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या