छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द...

Image may contain: 5 people, people sitting
शिक्रापूर, ता. १८ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीने घेतला आहे.वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असून येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे.दरवर्षी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून येथे ५० हजारांहून अधिक शंभूभक्त पुण्यतिथी कार्यक्रमासाठी येत असतात.परंतु, सध्या देशभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रारात सर्व सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे तसेच आदी गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

२४ मार्च रोजी होणारी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने ५० हजारांहून अधिक शंभूभक्त येथे येण्याची शक्‍यता असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती सरपंच रेखा शिवले यांनी दिली आहे.यावेळी उपसरपंच रमेश शिवले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिवले, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, पोलीस नाईक ब्रह्म पोवार आदी उपस्थित होते.२४ मार्च रोजी होणारा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत रद्द करण्यात आला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसरात जाण्यास देखील बंदी करण्यात आली.कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव तसेच या ठिकाणी होणारी गर्दी व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता.खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे समाधीस्थळी शंभू भक्‍त, नागरिकांनी या ठिकाणी येणे टाळावे, तसेच काळजी घ्यावी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या