शिक्रापूर मध्ये बसचालकास मारहाण...

Image may contain: text
तळेगाव ढमढेरे, ता. १८ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील श्री गणेश हॉटेल समोर बस चालकाला पाठीमागून धडकून देखील कार चालकाने बस चालकास मारहाण केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
         



शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावरून जावेद सय्यद हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. MH. 30 BD. 5400) मधील ३० प्रवाशांसह जात असताना शिक्रापूर येथील श्री गणेश हॉटेल समोर बस आल्यानंतर पाठीमागून ब्रेझा कार (क्र. MH. 12 QF. 0807) ची बसला पाठीमागून धडक बसली.यावेळी बसचालक सय्यद हे खाली उतरून पाठीमागे गेले असता, दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाने सय्यद यांना ब्रेक का मारला असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली.यावेळी बस मधील प्रवाशी सदर कार चालकाला समजावून सांगत असतान तो कोणाचेही काही ऐकत नव्हता.  

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

कार चालकाने त्याचे नाव बापूराव अंबरनाथ गायकवाड (रा. कोंढापुरी) असे सांगितले.यावेळी झालेल्या मारहाणीत बसचालक जावेद सय्यद यांना मार लागला असून याबाबत जावेद जाफर सय्यद (रा. अकोट फाईल, ता. अकोला, जि. अकोला) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कार चालक बापूराव अंबरदास गायकवाड (रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे पुढील तपास करत आहेत.
 

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या