'ऑनलाईन' वीजबिल भरणाऱ्यांची संख्या ८१ हजारांनी वाढली

Image may contain: one or more people, people sitting, screen and laptop
बारामती, ता. १८ मार्च २०२० (प्रतिनिधी): महावितरणची वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या गेल्या ६ महिन्यात बारामती परिमंडल अंतर्गत सातारा व सोलापूर जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, शिरुर, दौंड तालुक्यांमध्ये ८१ हजारांनी वाढली आहे.वीजबिल भरणा केंद्रांतील गर्दी टाळण्यासाठी तसेच रांगेत उभे राहण्याऐवजी शक्यतो वीजग्राहकांनी विजबिलांचा भरणा घरबसल्या 'ऑनलाईन'द्वारे करावा,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे.बारामती परिमंडलामध्ये गेल्या ६ महिन्यात 'ऑनलाईन' वीजबिल भरणा करणाऱ्या वीजग्राहकांच्या संख्येत ८१ हजारांनी वाढ झाली आहे.यात सोलापूर जिल्हा-३०,५००, सातारा जिल्हा- २६,२०० आणि बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, पुरंदर व भोर तालुक्यातील (जि. पुणे) २४,३०० ग्राहकांचा समावेश आहे.बारामती परिमंडलमधील बारामती विभाग, सासवड विभाग, केडगाव विभाग तालुक्यांमध्ये गेल्या ऑगस्ट २०१९ मध्ये ७१ हजार ग्राहकांनी विजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा केला होता.तर गेल्या जानेवारीमध्ये ९५,३०० ग्राहकांनी 'ऑनलाईन' वीजबिल भरणा केला आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

'ऑनलाईन' बिल भरणा झाले निःशुल्क- क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे.याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते.परंतु, क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.'ऑनलाईन' बिल भरल्यास ०.२५ टक्के सूट- लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे.क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे.ही सूट मिळविण्यासाठी संबंधीत ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी.तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.


महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ऍपची सेवा उपलब्ध आहे.चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे.त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपवरून घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या