शिरुरला ४२ हजारांची लाच घेताना लिपिकास अटक...


शिरुर,ता. १९ मार्च २०२० (तेजस फडके): शिरुर नगर परिषदेमधील लिपीकाला ४२ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. चंद्रकांत रंगनाथ पठारे ( वय ४७ ) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार हे शिरुर नगर परिषद मध्ये लेबर पुरविण्याचे काम करत होते. या कामाचे फेब्रुवारी २०२० चे बिल रक्कम २ लाख ७ हजार रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले होते.त्या बदल्यामध्ये मोबदला म्हणून लोकसेवक पठारे यांनी तक्रारदार यांच्याकडे ४२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.याबाबत  तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबाबत तक्रार केली होती.यावेळी  पडताळणी केली असता त्यामध्ये लाच मगितल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार बुधवार (दि १८) रोजी सायंकाळी शिरुर नगर परीषदेच्या लिपिकाला ४२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक  राजेश बनसोडे,अपर पोलीस अधीक्षक  संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पूणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६८ क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त तसेच पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे  यांनी केले आहे .
  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या