शिरूर तालुक्यातील दोन कन्या बनल्या फौजदार...

शिरूर, ता. 19 मार्च 2020 (PoliceKaka): शिरूर तालुक्यातील दोन कन्या फौजदार बनल्या असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक कन्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तेजश्री ज्ञानेश्वर नरके आहे तर दुसरी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील वर्षा जनार्दन साबळे.


दोन वर्षांपूर्वी झालेल्या फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला. तळेगाव ढमढेरे परिसरातील तेजश्री ज्ञानेश्वर नरके पहिलीच फौजदार ठरली. त्यात मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतलेली तेजश्री पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाली.


जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे मला हे यश मिळाल्याचे तेजश्रीने या वेळी सांगितले. फौजदारपदी निवड झाल्याबद्दल तिचा ग्रामस्थांतर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला. या वेळी तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.टाकळी हाजी येथील वर्षा जनार्दन साबळे उत्तीर्ण झाली असून, महाराष्ट्रामधून मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; तर धनगर या विशेष प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी तिची नियुक्ती झाली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.


No photo description available.

अविनाश रंगनाथ घोरपडे याने यश मिळविले....
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत शिरूर तालुक्‍यातील तांदळी (ता. शिरूर) माळवाडी येथील अविनाश रंगनाथ घोरपडे याने यश मिळविले. अविनाशची आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात, तर वडील मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करतात. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. अविनाशने हेच स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक कष्ट करून स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. अविनाशने इलेक्‍ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. अविनाशने यापूर्वी दोन वेळा परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याला अपयश आले होते. परंतु एवढ्यावर निराश न होता आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाशने स्वरूपवर्धिनी या सामाजिक संस्थेत "कमवा व शिका' या योजनेच्या माध्यमातून पुणे येथे राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने अविनाशने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. संतोष शिदनकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.शिरूर तालुका डॉट कॉमच्या पेजला जरूर लाईक करा...

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या