शिरूरला पकडलेल्या दरोडेखोरांकडे काय होते पाहा...

Image may contain: text
शिरूर, ता. 19 मार्च 2020 (PoliceKaka): शिरूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीने आलेल्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड हे साहित्य जप्त केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.


इर्शाद विजय काळे, राहुल विजू काळे, नरेश रमेश चव्हाण, राजू गुलाब मिस्त्री व एक अनोळखी, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे हे सुदाम खोडदे, गणेश आगलावे, संजय जाधव या पोलिस पथकासह गस्त घालत होते. त्या वेळी पाषाणमळ्याजवळ काही जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी इतर पोलिसांना बोलावून घेऊन संशयित आरोपींना चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले. माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना शिरूर पोलिस ठाण्यात आणून झडती घेतली. त्या वेळी त्यांच्याकडे लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, लाल तिखटाची पुडी आढळून आली.पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांच्यातील काहींनी चोरीच्या उद्देशाने आल्याचे कबूल केले. या चोरट्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यासोबत आणखी काही चोरटे असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या