निमगाव म्हाळुंगी केंद्रावर तोतयाने केला असा पराक्रम...

निमगाव म्हाळुंगी, ता. 20 मार्च 2020 (PoliceKaka): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणारा तोतया परीक्षार्थी केंद्र संचालकाने पकडला असून, त्याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.


निमगाव म्हाळुंगी येथील दहावीच्या परीक्षा केंद्रात प्रवेश तिकिटावर खाडाखोड करून त्यावरील फोटो बदलून परीक्षा देण्यासाठी बसलेल्या तोतया परीक्षार्थीसह एका विद्यार्थ्यावर शिक्रापूर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तोतयागिरी करणारा उमेश ज्ञानेश्वर येलभर (वय 22, रा. मोटेवाडी, ता. शिरूर) व मूळ परीक्षार्थी शेखर श्रीरंग पवार अशी तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

येथील परीक्षा केंद्रातील परीक्षागृहात केंद्र संचालक दिलीप पवार हे परीक्षार्थींची  तपासणी करीत असताना शेखर श्रीरंग पवार या विद्यार्थ्याच्या रिसिटवर दुसऱ्याचा फोटो असल्याचे निदर्शनास आले. केंद्र संचालक पवार यांनी संबंधित तोतया विद्यार्थ्यांचे नाव विचारले असता, नावात तफावत आढळली. शेखरर श्रीरंग पवार या मूळ परीक्षार्थीच्या रिसिटवर उमेश येलभर याने स्वतःचा फोटो चिकटवून परीक्षागृहात तोतयागिरी केल्याची खात्री झाल्याने तोतयाविरुद्ध शिक्रापूर पोलिसांत केंद्रसंचालक पवार यांनी तक्रार दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या