शिरूर शहरामध्ये तिघे फॉरेन रिटर्न...

Image may contain: 7 people, people sitting, table and indoor
शिरूर, ता. २० मार्च २०२० (तेजस फडके): शिरूर मध्ये २ दुबई व १ जण इंग्लडवरून आलेले होते, त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.तरीसुद्धा त्यांनी बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.शिरूर नगर परिषदेच्या वतीने कोरोना व्हायरस आजार व त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याबद्दल काय उपाययोजना कराव्यात यासाठी शिरूर नगर परिषद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व इतर कार्यालयाचे अधिकारी यांची बैठक बोलावली होती.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेशकुमार रोकडे, आरोग्य खात्याचे डॉ. तुषार पाटील, डॉ. मंगेश ननावरे, डॉ. आदित्य साबळे, पोलीस अधिकारी भगवान पालवे, लक्ष्मण पठारे, नगरसेवक विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, नगरसेविका मनीषा कालेवार, रोहिणी बनकर, उज्वला वारे, पूजा जाधव, ज्योती लोखंडे, सुनिता कुरुंदळे, सुरेखा शितोळे, रेश्‍मा लोखंडे यांसह नगरसेविका उपस्थित होते.डॉ. तुषार पाटील म्हणाले शासनाच्या सूचनेनुसार शहरातील ३ सार्वजनिक उद्याने, शाळा महाविद्यालये जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत.शिरूर मध्ये दर शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजार ही बंद ठेवण्यात येणार आहे.कोरोनोचा पार्श्‍वभूमीवर शहरात वॉर्डनिहाय नोडल आधिकारी नेमण्यात आले आहेत.त्याचबरोबर औषध पावडरची फवारणी २ दिवसांपासून करण्यात येत आहे.कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील डॉक्‍टर, केमिस्ट दुकानदार, नगराध्यक्ष व शासकिय अधिकारी यांच्या व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर अपडेट घेतली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या