शासनाच्या आदेशाला शिरुर मधील व्यापाऱ्यांची केराची टोपली

Image may contain: 1 person, outdoor
शिरूर, ता. २० मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकार, जिल्हाधिकारी यांनी काढलेला जमावबंदीचा आणि दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला.या आदेशाला शिरूर शहरातील दुकानदारांनी केराची टोपली दाखवली असून दुकाने सुरूच ठेवली आहे.त्यामुळे कोरोनाची गांभीर्यता या व्यापाऱ्यांना कळली नसल्याचे चित्र आहे.



शिरूर नगरपालिकेचे रिक्षा फिरवून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे.मात्र, दुकाने सुरू आहेत.ही दुकाने बंद ठेवण्याबाबत कोणतीही उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून केली जात नाही आहे.याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.कोरोनाबाबत शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव गंभीर झाली आहे.परंतु, तालुक्‍यातील सर्वात मोठे शहर शिरूर परिसरातील नागरिक गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

तालुका वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील व तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी बैठक बोलविली होती.यात आजाराबाबत चर्चा झाली असून, दक्षता काय घ्यायची याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते.पण दुकानदारांनी आवाहनाला प्रतिसाद न देता.सकाळपासूनच शिरूर शहरातील हॉटेल्स, छोटे व्यावसायिक, मोठे व्यावसायिक यांनी आपले व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू ठेवले होते.



शिरूर तालुक्‍यात सर्वांत मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून या पंचतारांकित वसाहती हजारो कामगार काम करीत आहेत.कोरोनामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पण कंपनी व्यवस्थापन व इतर शासकीय कार्यालय या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नाही.त्यामुळे या वसाहतीत काम करणारे कामगार हवालदिल झाले आहेत.आम्हालाही जगायचे असे म्हणत आम्हालाही सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी कामगार करीत आहेत. आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या