पिंपरी मधील 'येस' बॅंकेत अडकलेले ९८४ कोटी रुपये परत...

Image may contain: outdoor
पिंपरी, ता. २०मार्च २०२० (प्रतिनिधी): आर्थिक निर्बंधांमुळे खासगी क्षेत्रातील 'येस' बॅंकेत अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ९८४ कोटी २६ लाख रुपये गुरुवारी (दि. १९) रात्री अखेर परत मिळाले आहेत. गुरुवारी उशिरा महापालिकेला पैसे मिळाले असून, राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरीतील बॅंक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत. १५ दिवसांनी महापालिकेला पैसे मिळाले आहेत.त्यामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.येस बॅंकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) खासगी क्षेत्रातील येस बॅंकवर ५ मार्च रोजी निर्बंध लागू केले होते.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे दैनंदिन कररूपी गोळा झालेले तब्बल ९८४ कोटी २६ लाख रुपये बॅंकेत अडकले होते.त्यामुळे महापालिकेला आर्थिक झटका बसला होता.मागील २ वर्षांपासून 'येस' बॅंकेशी व्यवहार केला होता.महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा 'येस' बॅंकेत जमा होत होता.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

या महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केला जातो.ठेकेदारांना मोबदला दिला जातो.तो मार्च २०२० पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे.बॅंकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या 'कॅश फ्लो'वरही परिणाम झाला होता.त्यासाठी येस बॅंकेत अडकलेले महापालिकेचे ९८४.२६ कोटी तातडीने अदा करावेत, अशी विनंती प्रशासनाने केली होती. RBI ने २ दिवसांपूर्वी 'येस' बॅंकेवरील निर्बंध उठविल्याने बॅंकेचे कामकाज सुरळीत झाले होते.त्यानंतर गुरुवारी (दि. १९) रात्री महापालिकेचे 'येस' बॅंकेत अडकलेले ९८४ कोटी २६ लाख रुपये परत मिळाले आहेत.पिंपरी चिंचवड महापालिकेचे 'येस' बॅंकेत अडकलेले ९८४ कोटी २६ लाख रुपये परत मिळाले आहेत.गुरुवारी (दि. १९) रात्री पैसे मिळाले.राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरी शाखेतील बॅंक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत.महापालिकेचे सर्व व्यवहार बॅंक ऑफ बडोदामधून होत आहे.दैनंदिन भरणा याच बॅंकेत केला जात आहे.तर यापुढे राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये पैसे ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनीही स्पष्ट केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या