Poll: रांजणगाव एमआयडीसीत अनेक कंपन्या सुरूच...

रांजणगाव गणपती, ता. 22 मार्च 2020: "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात काळजी घेतली जात असताना रांजणगाव एमआयडीसीतील अनेक उद्योग मात्र सुरूच राहिल्यामुळे कर्मचाऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसीत हजारो कामगार या कंपन्यांतून काम करत असून, त्यांच्या सुरक्षेबाबत कंपन्यांकडून अभावानेच खबरदारी घेतली जात असल्याचे दिसते.


रांजणगाव एमआयडीसीतील काही छोटे उद्योग बंद असले; तरी अनेक मोठ्या कंपन्या चालूच आहेत. यात देशी- विदेशी बड्या उद्योगांचाही समावेश आहे. छोट्या उद्योगांमधील कामगारांनी गावाचा रस्ता धरला असला; तरी मोठ्या कंपन्यांत शनिवारी दुपारपर्यंत विविध शिफ्टमधील काम सुरळीत सुरू होते. कोरेगाव, शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील बऱ्याच छोट्या-मोठ्या कंपन्याही सुरू आहेत. अनेक कंपन्यांतील प्रशासनातील अधिकारी व इतर स्टाफ पुण्यात राहायला असून, रोज कंपनीच्या बसने किंवा खासगी मोटारीने ये-जा करतात.


एमआयडीसी परिसरात फेरफटका मारला असता अंतर्गत रस्त्यांवर, काही कंपन्यांच्या आवारात शुकशुकाट जाणवत असला; तरी अनेक ठिकाणी कामाच्या पाळ्या सुरळीत चालू असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. कामगारांना "मास्क' बंधनकारक केले असून, ते नसल्यास प्रवेश दिला जात नसल्याचे काही कारखानदारांकडून सांगण्यात आले. काही मोठ्या उद्योगांत खबरदारीचे उपाय योजले जात असले; तरी ते जुजबी असल्याचे दिसून येत आहेत.दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रांजणगाव एमआयडीसी मात्र चालू आहे. विविध भागांमधून कर्मचारी येत असल्यामुळे तेथे कोणतेही गांभीर्य नाही अशी स्थिती पाहायला मिळत आहे. शासनाने रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्या त्वरित बंद करून कामगारांना सुट्टी द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.


शिरूर तालुका राष्ट्रवादी कामगार युनियनचे अध्यक्ष विकास रामभाऊ मासळकर यांनी उपस्थितीत केलेले मुद्देः
 •  कोरोना व्हायरसच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का?
 • सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्हा परिसरासाठी जमावबंदी लागू केलेली आहे. खरोखर चागल्या पद्धतीची कामगिरी सरकार करत आहे.
 •  परंतु आऊद्योगिक वसाहती मधील परिस्थिती खूप वेगळी आहे. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही का?
 • एका कंपनीमध्ये, एका वेळी, एका शिफ्ट मध्ये 1000 च्या आसपास कामगार एकत्र येतात,
 •  एकाच कॅंटीनमध्ये हजारो कामगार एकत्र येऊन जेवण करतात…
 •  एकाच प्रसाधन गृहाचा वापर हजारो कामगारांना मार्फत केला जातो...
 •  पुणे शहरातून हजारो कामगार रोज रांजणगाव सनसवाडी भागातील एमआयडीसीमध्ये ये जा करत आहेत....
 •  पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अनेक कामगारांचे संपर्क होतो.....
 •   विविध ठिकाणावरून येऊन ऐकाच बस ने प्रवास करतात. अशा अनेक ठिकाणी कसलाही धोका नाही वाटत का शासनाला?
 • रांजणगाव, सणसवाडी MIDC मध्ये 100 च्या वर कंपन्या चालू आहेत, म्हणजे एका कंपनीत सरासरी एका शिफ्टला 200 कामगार पकडले तरी, 200x 100 = ???, आणि काही कंपन्या 3 शिफ्ट मध्ये चालतात... मग कुठं जातो हा आकडा ???
 • इथं सगळ्या गावांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलाय शासनाच्या आदेशाला,  पण या कंपन्यांना आदेश द्यायला शासन का कचरत आहे..??
 • का ?? इथं  नागरिकांना धोका वाटत नाही का शासनाला? सदर विषयावर शासनाकडून योग्य तो सकारात्मक विचार व्हावा ही विनंती.
Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या