एमआयडीसीत कामाला लावतो बोलला अन् केला बलात्कार

शिरूर, ता. 22 मार्च 2020 (PoliceKaka): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत कामाला लावण्यासह लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोलिसांनी बलात्कार व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.


हर्षवर्धन सदाशिव पवार (रा. जांबुड, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी कामाच्या शोधात कारेगाव (ता. शिरूर) येथे आलेल्या पीडित तरुणीशी पवार यांची ओळख झाली. त्याने तिला कंपनीत कामाला लावण्यासह लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर मित्राच्या घरी व तिच्या मैत्रिणीच्या घरी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिल्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला लावून गर्भपात केला. पीडितेच्या तक्रारीनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पवार याला ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्‍वर्या शर्मा तपास करीत आहेत.आईच्या डोक्‍यात घातली कुऱ्हाड...
दारूसाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या मुलाने आईच्या डोक्‍यात कुऱ्हाड घातल्याची घटना निर्वी येथे घडली. शिवाय, त्याने बहिणीला सुद्धा मारहाण केली. रंजना नारायण सोनवणे (वय 65, रा. निर्वी, ता. शिरूर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. त्यावरून त्यांचा मुलगा विठ्ठल नारायण सोनवणे यांच्याविरोधात शिरूर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना शेतात काम करून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास उशिरा घरी आल्या. त्या वेळी दारूच्या नशेत विठ्ठल तेथे आला व पुन्हा दारूसाठी पैशांची मागू लागला. रंजना यांनी नकार देताच त्याने ज्वारीचा कडबा पेटवून देण्याची धमकी दिला. मात्र, रंजना यांनी तरीही पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आईला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने आईच्या डोक्‍यात, मानेवर व हातावर घाव घातले. रंजना यांची मुलगी कल्पनामध्ये आली असता विठ्ठलने तिलाही मारहाण केली व तो पळून गेला. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या